ETV Bharat / business

Loan on Adani Group : अदानी समूहावर किती कर्ज? ते फेडण्यासाठी समूह काय करतोय? जाणून घ्या - अदानी समूह कर्ज

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालाने अदानी समूहात खळबळ उडाली आहे. या अहवालानंतरच अदानी समूहाकडे कोणत्या बँकांचे एवढी कर्जे आहेत हे उघड होऊ लागले. अशा परिस्थितीत, अदानी समूह हे कर्ज फेडण्यासाठी काय करत आहे हे जाणून घेणे मनोरंजक आहे. चला या अहवालात जाणून घेऊया.

Gautam Adani
गौतम अदानी
author img

By

Published : Feb 19, 2023, 12:04 PM IST

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानींचे वासे सध्या फिरले आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली, जी अद्यापही सुरूच आहे. या काळात अदानी समूहाची संपत्ती जवळपास निम्म्याने कमी झाली आहे. फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीतही त्यांची दुसऱ्या स्थानावरून 24 व्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती 49.7 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्यानुसार, त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि जम्मू आणि काश्मीर बँकेसह इतर स्त्रोतांकडून कर्ज घेतल्याचे म्हटले आहे.

अदानी समूहाचे एकूण कर्ज किती? : जागतिक ब्रोकरेज फर्म सीएसएलआर (CSLR) नुसार, अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जामध्ये भारतीय बँकांचा वाटा 40 टक्क्यांहून कमी म्हणजेच 80 हजार कोटी इतका आहे. यामध्ये खाजगी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची टक्केवारी 10 टक्यांपेक्षा कमी आहे. झेफेरीन या जागतिक कंपनीच्या म्हणण्यानुसार, बँकांनी अदानी समूहाला दिलेले कर्ज विहित मर्यादेत आहे. विशेष म्हणजे अदानी समूहावरील कर्जाची रक्कम अवघ्या तीन वर्षांत दुप्पट झाली आहे.

म्हणून कर्जाचा डोंगर उभा राहिला : अदानी समूहाच्या दोन कंपन्या, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स व स्पेशल इकॉनॉमिक झोनचे मार्चमध्ये सुमारे 50 अब्ज रुपये किंवा 605 दशलक्ष डॉलर किमतीचे व्यावसायिक पेपर मॅच्युअर होणार होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी समूह त्यांना आगाऊ पैसे देण्यास बांधील होता. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाने कर्ज घेण्यासाठी सर्व कर्ज पर्यायांचा (व्यावसायिक कागद, रोखे, अल्प-मुदतीचे बाँड आणि स्टॉक्सवरील कर्ज) वापर केला. या मुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला.

कर्ज फेडण्यासाठी समूह काय करतो आहे? :

  1. अदानी समूह कमर्शिअल पेपरच्या कर्जाची परतफेड करण्याची योजना बनवत आहे जे त्वरित पूर्ण केले जाईल. या सोबतच कंपनीने म्हटले आहे की, ती प्रायव्हेट प्लेसमेंट, प्रायव्हेट इक्विटी किंवा इतर माध्यमातून भांडवल उभारून बाँडची परतफेड करेल. विशेष म्हणजे, जून 2024 च्या शेवटी अदानी ग्रीन एनर्जीचा एक बाँड येणार आहे. बाजाराचा मूड मुख्यत्वे या बाँडवर तसेच कंपनीच्या पतपात्रतेवर अवलंबून असेल.
  2. निर्धारित कालावधीपूर्वी शेअर्सच्या बदल्यात कर्ज परत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात आले. त्यामुळेच अदानी समूहाच्या वतीने अल्पमुदतीच्या कमर्शियल पेपर लोनसाठी खासगी फायनान्सरशी चर्चा सुरू आहे. कुठूनतरी काही संसाधनांची व्यवस्था केली तर अदानी समूह आपले कर्ज फेडू शकेल, असे त्यांना सांगितले जात आहे.
  3. अदानी समूह प्रमुख बँकांना बोलतो आहे की तुम्ही सर्व बाँडधारकांशी बोला आणि त्यांना पटवून द्या की अदानी समूहाकडे पैसे/संसाधने आहेत, ज्याद्वारे ते पैसे परत करतील. विशेष म्हणजे, अदानी समूह आपल्या खाजगी क्रेडिट आणि कॅशफ्लोद्वारे कर्जाची त्वरित परतफेड करण्याचा प्रयत्न करेल.
  4. अदानी एंटरप्रायझेसने नवीन रस्ते प्रकल्पांवरील भांडवली खर्च गोठवला आहे. उदाहरणार्थ, अदानी समूहाने डीबी पॉवर करार रद्द केला. अदानी समूह सध्या कोणत्याही नवीन प्रकल्पात गुंतवणूक करणार नाही. याशिवाय सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमधील भांडवली खर्चही कमी केला जाईल. उत्तर प्रदेशातील मेरठ-प्रयागराजमधील 464 किमीचा गंगा एक्सप्रेसवे प्रकल्प मात्र थांबवला जाणार नसून तो पूर्ण केला जाईल, असे समूहाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Adani Group Forbes Report: रशियन बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अदानींनी तारण ठेवले 'स्टेक्स'.. किंमत ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.