टेक डेस्क - चीनची स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी Xiaomi चा सब ब्रांड Poco F1 भारतीय युजर्समध्ये प्रंचड लोकप्रिय ठरला आहे. स्मार्टफोन युजर्सनी या फोनला पहिली पसंती दिली आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या IDC च्या अहवालात १५ हजार रुपयांपेक्षा महाग असलेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत Poco F1 ने OnePlus 6 ला धोबीपछाड दिला आहे.
Now it's settled! As per @IDC, #POCOF1 is India's #1 Smartphone in online smartphone market of ₹15k & above.
— Manu Kumar Jain (@manukumarjain) March 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Champion of Speed doesn't settle for 2nd place. Nor should you!
RT my tweet + Tweet with #POCOF1, tell me why you love this beast (tag me). 1 fan to win a POCO F1! pic.twitter.com/fDjDM8hfpk
">Now it's settled! As per @IDC, #POCOF1 is India's #1 Smartphone in online smartphone market of ₹15k & above.
— Manu Kumar Jain (@manukumarjain) March 27, 2019
The Champion of Speed doesn't settle for 2nd place. Nor should you!
RT my tweet + Tweet with #POCOF1, tell me why you love this beast (tag me). 1 fan to win a POCO F1! pic.twitter.com/fDjDM8hfpkNow it's settled! As per @IDC, #POCOF1 is India's #1 Smartphone in online smartphone market of ₹15k & above.
— Manu Kumar Jain (@manukumarjain) March 27, 2019
The Champion of Speed doesn't settle for 2nd place. Nor should you!
RT my tweet + Tweet with #POCOF1, tell me why you love this beast (tag me). 1 fan to win a POCO F1! pic.twitter.com/fDjDM8hfpk
Xiaomi India चे प्रमुख मनु कुमार जैन यांनी यासंबंधी ट्विट करत माहिती दिली आहे. मनु कुमार जैन यांनी ट्विटमध्ये OnePlus च्या टॅगलाईन (नेव्हर सेटल्ड) वरही निशाणा साधला आहे. नाऊ इट्स सेटल्ड असा टोमणा त्यांनी OnePlus ला मारला आहे. मनु जैन यांनी ट्विटसह एक फोटो पण पोस्ट केला आहे. यामध्ये OnePlus 6 आणि Poco F1 चे छायाचित्र दिसत आहे. IDC चा डेटा यामध्ये दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये OnePlus चे मार्केट शेअर 17.9 टक्के दाखवण्यात आले आहेत तर Poco F1 चे मार्केट शेअर २२.५ टक्के दाखवण्यात आले आहे.
सध्या भारतीय बाजारात स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट प्रोसेसरसह मिळणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये Poco F1 ची किंमत सर्वात कमी आहे. हे प्रोसेसर फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससाठी गेल्यावर्षी सादर करण्यात आले होते.
Poco F1 चे फिचर्स
- 6.18 इंचीचा फुल एचडी डिस्प्ले नॉच फीचर
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर
- 4G+ नेटवर्क सपोर्ट
- 4,000 एमएच बॅटरी
- तीन मेमोरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध (6GB+64GB, 6GB+128GB, 8GB+256GB आणि 8GB+512GB )
- अँड्रॉईड ओरिओ ८.१ ऑपरेटिंग सिस्टम