लंडन - कोरोनाचा सर्वच क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला असताना खनिज तेलाची किमती कमालीच्या घसरल्या आहेत. वेस्ट टेक्सास इंटरमिडियट (डब्ल्यूटीआय) हा जागतिक तेलाच्या किमतीचा निर्देशांक आहे. या बाजारपेठेत खनिज तेलाची किंमत घसरून प्रति बॅरल केवळ १९.२० डॉलर झाली आहे.
कोरोना महामारीने जगभरातील देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे खनिज तेलाची जागतिक बाजारपेठेतील मागणी कमी झाली आहे. खनिज तेलाची मागणी प्रति दिन ९.३ दशलक्ष बॅरलने कमी झाली आहे. यापूर्वी १९९५ मध्ये प्रतिदिन २९ दशलक्ष बॅरल खनिज तेलाची मागणी कमी झाली होती, असे आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा- ओपेकसह रशियाने खनिज तेलाचे उत्पादन कमी करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे.
दरम्यान, भारतात २५ मार्चला लागू केलेली टाळाबंदी २ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे केवळ जीवनावश्यक सेवांसाठी वाहनांची वाहतूक सुरू आहे.
हेही वाचा-सोन्याचा दर प्रति तोळा ५० हजार होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण