ETV Bharat / business

चांदी प्रति किलो ४५ हजार रुपये! २ हजार रुपयाने वधारून 'विक्रमी' चमक

author img

By

Published : Aug 13, 2019, 5:22 PM IST

औद्योगिक घटकांसह नाणेनिर्मिती करणाऱ्यांकडून  मागणी वाढल्याने चांदीचे दर वाढल्याचे अखिल भारतीय सराफ संघटनेने सांगितले. या संघटनेचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, चांदीला प्रति किलो ४५ हजार रुपया हा आजपर्यंतचा सर्वोच्च भाव मिळाला आहे.

चांदी , Silver

नवी दिल्ली - चांदीच्या दरात आज प्रति किलो २ हजार रुपये एवढी विक्रमी भाववाढ झाली. चांदीचा भाव प्रति किलो हा ४५ हजार रुपये झाला आहे. तर सोने हे प्रति तोळा १०० रुपयाने घसरून ३८,३७० रुपयावर पोहोचले आहे.

औद्योगिक घटकांसह नाणेनिर्मिती करणाऱ्यांकडून मागणी वाढल्याने चांदीचे दर वाढल्याचे अखिल भारतीय सराफ संघटनेने सांगितले. या संघटनेचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, चांदीला प्रति किलो ४५ हजार रुपये हा आजपर्यंतचा सर्वोच्च भाव मिळाला आहे.

नवी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा दर हा १०० रुपयाने कमी होऊन ३८,७०० रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम) झाले. तसेच ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर हा १०० रुपयांनी घसरून ३८,२०० रुपये झाले आहे. सार्वभौम सोन्याचा दर हा प्रति ८ ग्रॅमला २०० रुपयाने वधारून २८,८०० रुपयावर पोहोचले. सोन्याचा दर ३८,४७० रुपये प्रति तोळा भाव झाल्याने सोमवारी विक्रमी किमतीचा उच्चांक झाला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.