मुंबई - अर्थसंकल्पानंतर मुंबई शेअर बाजार निर्देशांक ९१७ अंशांनी वधारून ४०,७८९.३८ वर स्थिरावला. तर सोने प्रति तोळा ३८८ रुपयांनी स्वस्त होवून ४१,६५८ रुपये झाले आहे.
शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांकही वधारला. निफ्टीचा निर्देशांक २७१.७५ अंशांनी वधारून ११,९७९.६५ वर पोहोचला.
हेही वाचा-अर्थव्यवस्थेत मंदी नाही; अनुराग ठाकूर यांचा दावा
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
टायटनचे सर्वाधिक ७.९७ टक्क्यांनी शेअर वधारले. आयटीसी, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि टाटा स्टीलचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे बजाज ऑटो आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअरही घसरले आहेत. कोरोना विषाणुमुळे जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास वाढीला लागला आहे.
हेही वाचा-'गुगल पे'मधील 'त्या' त्रुटीने वापरकर्ते संभ्रमात; आर्थिक व्यवहारात येतोय अडथळा
-सोन्याचे दर-
सोने दिल्लीत प्रति तोळा ३८८ रुपयांनी घसरून ४१,२७० रुपये झाले आहे. वधारलेला रुपया, जागतिक बाजारात सोन्याच्या विक्रीचे वाढलेले प्रमाण या कारणांनी सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. चीनच्या केंद्रीय मध्यवर्ती बँकेने चलनाची तरलता (लिक्विडिटी) पुरेशी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील सोन्याचे दर घसरले आहेत.