ETV Bharat / business

शेअर बाजार ६९२ अंशांनी वधारला; आर्थिक पॅकेज जाहीर होण्याची गुंतवणूकदारांना अपेक्षा - Share Market today

मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात १,२७४.४५ अंशांनी वधारून २७,२५५.६९ वर स्थिरावला. तर मागील सत्रात मुंबई शेअर बाजार बंद होताना २५,९८१.२४ वर स्थिरावला होता.

Mumbai Share Market
शेअर बाजार
author img

By

Published : Mar 24, 2020, 12:22 PM IST

Updated : Mar 24, 2020, 4:47 PM IST

मुंबई - कोरोनाचे संकट असताना आर्थिक पॅकेज जाहीर होईल, या आशेने मुंबई शेअर बाजार सावरला आहे. मुंबई शेअर बाजार ६९२.७९ अंशांनी वधारून २६,६७४.९३ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १९०.८० अंशांनी वधारून ७,८०१.०५ वर स्थिरावला. कोरोनाचा प्रसार वाढत असताना लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज घोषणा केली.

शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात १,२०० अंशांनी घसरण झाली आहे. शेअर बाजाराने ३,९०० च्या घसरणीनंतर आजपर्यंतची सर्वात घसरण सोमवारी अनुभवली होती. त्यानंतर शेअर बाजार आज सावरला आहे. मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात १,२७४.४५ अंशांनी वधारून २७,२५५.६९ वर स्थिरावला. तर मागील सत्रात मुंबई शेअर बाजार बंद होताना २५,९८१.२४ वर स्थिरावला होता. विमान कंपन्यांचे शेअर १० टक्क्यापर्यंत घसरले आहेत. सरकारने देशातील विमान उड्डाणे २५ टक्क्यापर्यंत रद्द केले आहेत. त्याचा फटका विमान कंपन्यांच्या शेअरला बसला आहे.

हेही वाचा-घरून काम करण्यासाठी जिओचे प्रोत्साहन; ब्रॉडबँडकरता दिली ऑफर

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

इन्फोसिस, बजाज फायनान्स, मारुती, एचयूएल, एचसीएल, टेक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले आहेत. तर एम अँड एम, इंडसइंड बँक, आयटीसी, पॉवरग्रीड आणि एल अँड टीचे शेअर घसरले आहेत. बाजार तज्ज्ञांच्या मतानुसार केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे.

हेही वाचा-कोरानाचा प्रसार वाढल्याने इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत थांबविले उत्पादन

Last Updated : Mar 24, 2020, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.