मुंबई - कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने शेअर बाजार गुंतवणूकदारांनी धसका घेतला आहे. मुंबई शेअर बाजार १,७०९.५८ अंशांनी घसरून २८,८६९ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ४९८.२५ अंशांनी घसरून ८,४६८.८० वर स्थिरावला. या घसरणीनंतर निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराने निर्देशांकाचा गेल्या तीन वर्षातील निचांक नोंदिवला आहे.
शेअर बाजार निर्देशांक दुपारी १२ वाजून ४३ मिनिटाला १,१३७.२२ अंशांनी घसरला. या घसरणीनंतर निर्देशांक २९,४४१.८७ वर पोहोचला.
मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात ४१५.९५ अंशांनी घसरून ३०,१६३.१४ वर पोहोचला होता.तर निफ्टी ५० चा निर्देशांक १०३.७५ अंशांनी घसरून ८,८६३.३० वर पोहोचला. तर मागील सत्रात मुंबई शेअर बाजार बंद होताना ३०,५७९.०९ वर स्थिरावला होता.
हेही वाचा-अमेरिकेत ऑनलाईन खरेदीचे वाढले प्रमाण; अॅमेझॉन १ लाख कर्मचाऱ्यांना देणार नोकरी
मुंबई शेअर बाजार खुला होताना ४०० अंशांनी वधारून ३०,९६८.८४ वर पोहोचला होता. बँकिंग व वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या विक्रीसाठी बुधवारी दबाव दिसून येत आहे.
हेही वाचा-कोरोनाचा फटका : गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दोन दिवसातच ९.७४ लाख कोटींची घट
सन फार्मासिटीक्युल्स, हिंदुस्थान लिव्हर आणि इन्फोसिसचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. तर इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर सर्वाधिक घसरले आहेत.