मुंबई - किरकोळ बाजारात गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक महागाई वाढल्याची नोव्हेंबरमध्ये नोंद झाली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुंबई शेअर बाजाराने ४१,९०३.३६ या विक्रमी निर्देशांकाची नोंद केली आहे.
मुंबई शेअर बाजार सकाळी १०.०४ वाजता २०.६६ अंशाने घसरून ४१,८३९.०३ वर पोहोचला. बाजार खुला होताना निर्देशांक ४१,८८३.०९ वर पोहोचला होता. तर 'इन्ट्रा डे'ला ४१,९०३.३६ या विक्रमी अंशावर पोहोचला होता. निफ्टीचा निर्देशांक ५.४० अंशाने वधारून १२,३३४.९५ पोहोचला होता.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी ६८.२४ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ४७.१७ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
हेही वाचा-...म्हणून फ्लिपकार्टसह अॅमेझॉनची होणार चौकशी
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
टाटा स्टील, टीसीएस, हिरो मोटोकॉर्प, एचसीएल टेक, आयटीसी आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर वधारले आहेत. तर एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करा, वाणिज्य मंत्रालयाचा प्रस्ताव
किरकोळ बाजारात महागाईचा उच्चांक-
भारतीय रिझर्व्ह बँकेने किरकोळ बाजारात महागाईची मर्यादा अधिकतम ६ टक्के निश्चित केली आहे. ही मर्यादी ओलांडून किरकोळ बाजारात महागाईची ७.३५ टक्के नोंद झाली आहे.