मुंबई - जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर शून्य डॉलरपर्यंत घसरल्याचा शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. बाजार खुला होताना निर्देशांक ८१३.९० अंशांनी घसरून ३०,८३४.८० वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशाक हा २५१.१० अंशांनी घसरून ९,०१०.७५ वर पोहोचला.
कोरोना विषाणुच्या संकटामुळे सोमवारी अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झालेली पाहायला मिळाली. इतिहासात पहिल्यांदाच कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल शून्य डॉलरपर्यंत पोहोचली.
हेही वाचा-'जीवनावश्यक वस्तुंच्या साठेबाजीसह दरवाढ नाही; सरकारकडून बाजारावर कडक देखरेख'
वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) नुसार , सोमवारी (२० एप्रिल) कच्च्या तेलाची किंमत ० डॉलर प्रती बॅरल पेक्षा कमी होऊन - ३७.६७ डॉलर इतकी झाली आहे. खनिज तेलाच्या संकटामुळे जागतिक आर्थिक मंदी आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-'घरातून काम करण्याकरता लॅपटॉपचा समावेश जीवनावश्यक वस्तुत करा'