मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ८०७ अंशांनी घसरून ४०,३६३.२३ वर स्थिरावला आहे. कोरोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.
निफ्टीचा निर्देशांकही २५१.४५ अंशांनी घसरून ११,८२९.४० वर स्थिरावला. शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रांचे शेअर घसरले. टाटा स्टीलचे शेअर ६.३९ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ ओएनजीसी, मारुती, टायटन, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आणि भारती एअरटेलचे शेअरही घसरले आहेत.
हेही वाचा-सोन्याच्या किमतीने गाठला आजपर्यंतचा उच्चांक; जाणून घ्या वाढलेले दर
दक्षिण कोरियामध्ये कोरोनाने १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या शेअर बजारात घसरण झाली आहे. शांघाय, टोकिया आणि हाँगकाँगच्या शेअरचे नुकसान झाले आहे. इटलीमध्ये कोरोनाने ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर युरोप शेअर बाजाराचा निर्देशांक ४ टक्क्यांनी घसरला आहे.
खनिज तेलाच्या प्रति बॅरलचे दर ३.६२ टक्क्यांनी घसरून ५५.८४ डॉलर झाले आहेत. देशातील गुंतवणूकदारांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागलेले आहे. यापूर्वीच ट्रम्प यांनी भारताबरोबर मोठा व्यापार करार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा-'डोनाल्ड ट्रम्प यांना क्लिंटन आणि ओबामा यांच्यापेक्षा वेगळा भारत दिसेल'