ETV Bharat / business

काश्मीर ३७० च्या वादाने शेअर बाजाराच्या निर्देशांकाचे 'तीन तेरा', ५७० अशांची पडझड

author img

By

Published : Aug 5, 2019, 12:44 PM IST

मुंबई शेअर बाजार निर्देशांकाचा निर्देशांक ५७१.६७ अंशाने घसरून ३६,५४६.५५ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १६५.९५ अंशाने घसरून १०,८३१ वर पोहोचला

प्रतिकात्मक

मुंबई - राज्यसभेत काश्मीरमध्ये ३७० चे कलम हटविण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात ५७० अंशाची पडझड झाली.

मुंबई शेअर बाजार निर्देशांकाचा निर्देशांक ५७१.६७ अंशाने घसरून ३६,५४६.५५ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १६५.९५ अंशाने घसरून १०,८३१ वर पोहोचला.

काश्मीरमध्ये तणावाची स्थिती आणि ३७० कलम काढण्यात येत असल्याने गोंधळाची स्थिती-

काश्मीरमध्ये महत्त्वाच्या आणि संवेदनशील जागांवर सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तर अनेक काश्मीरमधील नेत्यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. तर काही नेत्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत काश्मीरचे ३७० कलम हटविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
शेअर बाजारात येस बँक, टाटा मोटर्स, वेदांत, एसबीआय, टाटा स्टील, पॉवर ग्रीड, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी बँक, रिलायन्स आणि मारुतीचे शेअर ८.४९ टक्क्यापर्यंत घसरले. तर टीएसीएस, इन्फोसिस, भारती एअरटेल आणि एचडीएफसी या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.

दरम्यान, आजपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आजपासून बैठक सुरू होत आहे. बुधवारी आरबीआय रेपो दरात २५ बेसिस पाँईटने कपात करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:Body:

dummey

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.