मुंबई- शेअर बाजार निर्देशांक दिवसाखेर ४४७ अंशाने वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराने पुन्हा ५०,००० चा टप्पा गाठला आहे. वाहन, बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. तर जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीचा देशातील बाजारावरही सकारात्मक परिणाम झाला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४४७.०५ अंशाने वधारून ५०,२९६.८० वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक १५७.५५ अंशाने वधारून १४,९१९.९० वर स्थिरावला.
हेही वाचा-जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा आठवा क्रमांक
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
एम अँड एम, एनटीपीसी, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, टीसीएस आणि मारुतीचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे ओएनजीसी, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज, पॉवरग्रीड आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर घसरले आहेत. क्षेत्रनिहाय निर्देशांकामध्ये २५ क्षेत्रांचे निर्देशांक वधारले आहेत.
हेही वाचा-धक्कादायक! चिनी हॅकरकडून सीरमसह भारत बायोटेकवर सायबर हल्ला- अहवाल
या कारणाने शेअर बाजार निर्देशांक वधारला!
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विकासदर किंचित वधारणार असल्याचा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेअर बाजार गुंतवणुकदारांनी शेअर खरेदीला प्राधान्य दिल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.७१ टक्क्यांनी वाढून ६३.७६ प्रति बॅरल आहेत.