मुंबई - कॉर्पोरेट कर कपात केल्यानंतर शेअर बाजार निर्देशांक आजही विक्रमी अंशाने वधारला. शेअर बाजार १०६५ अंशाने वधारून ३९,०९०.०३ वर बंद झाला. निफ्टीचा निर्देशांक ३२९.२० अंशाने वधारून दिवसाखेर ११,६०३.४० वर पोहोचला.
कॉर्पोरेट करात कपात झाल्यानंतर शेअर बाजार गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
शेअर बाजार बंद होताना या कंपन्यांचे शेअर घसरले वधारले-
बजाज फायनान्स, आयटीसी, एशियन पेंट्स, इंडुसइंड बँक, एल अँड टी, कोटक बँक, मारुती, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, टाटा स्टील, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक अँड हिंदुस्थान लिव्हरचे शेअर वधारले. तर इन्फोसिस, टीसीएस, टेकएम, एचसीएल टेक, एनटीपीसी आणि पॉवरग्रीडचे शेअर घसरले.
शेअर बाजार निर्देशांक सकाळी साडेनऊ वाजता १०३१.५८ अंशाने वाढून ३९,३४६.०१ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक २६३.७५ अंशाने वाढून ११,५३७.९५ वर पोहोचला.
सकाळच्या सत्रात या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
आयटीसी, एशियन पेंट्स, इंडुसइंड बँक, एल अँड टी, मारुती, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर ८ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. इन्फोसिस, टीसीएस, टेक एम, एचसीएल टेक, एनटीपीसी आणि पॉवग्रीडचे शेअर ८ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
हेही वाचा- एकाच दिवसात शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या भांडवली मूल्यात ७ लाख कोटींची भर!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर हा ३० टक्क्यावरून २२ टक्के करण्याचा निर्णय घेतला. तसेच नव्या उत्पादक कंपन्यांसाठी केवळ १५ टक्के कर लागू करण्याचा निर्णय घेतला. हा करातील बदल १ ऑक्टोबर २०१९ पासून लागू होणार आहे.
हेही वाचा-शेअर बाजारासह निफ्टीने गेल्या दहा वर्षाचा 'हा' मोडला विक्रम
मागील सत्रात शेअर बाजार निर्देशांक १,९२१.१५ अंशाने वधारला होता. एकाच दिवसात वधारण्याचा गेल्या दहा वर्षातील हा विक्रम होता. निफ्टीचा निर्देशांक ५६९.४० अंशाने वधारून गेल्या दहा वर्षातील वधारण्याचा उच्चांक विक्रम मोडला होता. शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांक दुपारी २ वाजून २० मिनिटाला २२०२ अंशाने वधारून ३८,२९५.८५ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ६५५.८५ अंशाने वधारून ११,३६०.६५ वर पोहोचला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने १ लाख ४५ हजार कोटींची कॉर्पोरेट सवलत जाहीर केली. या निर्णयाने शेअर बाजाराचा निर्देशांक १८०० अंशाने वधारल्याने कंपन्यांना शुक्रवारी चांगला फायदा झाला आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या भांडवली मूल्यात शुक्रवारी ७ लाख कोटींची भर पडली होती.