ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दिवसाखेर ८५ अंशांची घसरण - Share market latest news

आयटीसीचे सर्वाधिक सुमारे 3 टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, टीसीएस, एचसीएल टेक, एचडीएफसी आणि कोटक बँकेचे शेअर घसरले आहेत.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Jun 2, 2021, 8:26 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 85 अंशाने घसरला. जागतिक बाजारात संमिश्र स्थिती असताना आयटीसी, एचडीएफसी ट्विन्स आणि इन्फोसिसचे शेअर घसरले आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 85.40 अंशाने घसरून 51,849.48 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 1.35 अंशाने घसरून 15,576.20 वर स्थिरावला.

हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू; जाणून घ्या, तज्ज्ञांचा अंदाज

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

आयटीसीचे सर्वाधिक सुमारे 3 टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, टीसीएस, एचसीएल टेक, एचडीएफसी आणि कोटक बँकेचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे इंडसइंड बँक, पॉवरग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो आणि मारुतीचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून 'आयुष्यमान भारत'ला ठेंगा; तरतुदीपैकी केवळ ७ टक्के निधी - आरटीआय

भांडवली बाजार हा अस्थिर

पतधोरणाच्या तोंडावर देशातील भांडवली बाजार हा अस्थिर राहिला आहे. वित्तीय, आयटी आणि एफएमसीजी कंपन्यांच्या शेअरची विक्री दिसून आली आहे. मात्र, दिवसाखेर या शेअरच्या विक्रीचे प्रमाण कमी राहिल्याचे जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधक प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

पतधोरणात आरबीआयकडून रेपो दर हा जैसे थे राहण्याची शक्यता

अमेरिका आणि आशियामधील शेअर बाजारातही निर्देशांक घसरल्याचे नायर यांनी सांगितले. सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाची प्रक्रिया सरकारकडून लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. पतधोरणात आरबीआयकडून रेपो दर हा जैसे थे राहण्याची शक्यता आहे. वाढती महागाई आणि चलनाच्या तरलतेकिरता असा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे मत विनोद नायर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 0.98 टक्क्यांनी वधारून 70.98 डॉलर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.