मुंबई - शेअर बाजाराच्या निर्देशांकात सलग पाचव्या सत्रात घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,१४५ अंशाने घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि टीसीएसचे शेअर घसरले आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक १,१४५.४४ अंशाने घसरून ४९,७४४.३२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ३०६.०५ अंशाने घसरून १४,६७५.७० वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
डॉ. रेड्डीजचे शेअर सर्वाधिक सुमारे ५ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ एम अँड एम, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि टीसीएसचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे ओएनजीसी, एचडीएफसी बँक आणि कोटक बँकेचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-कोरोनाच्या लसीकरणात भारताला प्राधान्य; संयम बाळगण्याचे सीरमकडून देशांना आवाहन
आनंद राठीचे मुख्य संशोधक नरेंद्र सोळंकी म्हणाले की, दुपारच्या सत्रानंतर शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने मोठ्या प्रमाणात आर्थिक परिणाम होईल, असा अंदाज केला जात आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.६६ अंशाने घसरून प्रति बॅरल ६२.५५ डॉलर आहेत.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सलग दुसऱ्या दिवशी 'ब्रेक'