ETV Bharat / business

शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १०३० अंशाने वधारला; तांत्रिक त्रुटीचा निफ्टीला फटका - शेअर बाजार अपडेट न्यूज

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५५१.०३ अंशाने वधारून ५०,३०२.४४ स्थिरावला. एचडीएफसी बँकेचे शेअर सर्वाधिक सुमारे ३ टक्क्यांनी वधारले. त्या

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Feb 24, 2021, 6:02 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १०३०.२८ अंशांहून अधिक वधारला. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर २७४.२० अंशाने वधारला. निफ्टीच्या कामकाजात तांत्रिक अडचणींमुळे अडथळा आला होता.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १०३०.२८ अंशाने वधारून ५०,७८१.६९ वर स्थिरावला. एचडीएफसी बँकेचे शेअर सर्वाधिक सुमारे ३ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, एसबीआय, अ‌ॅक्सिस बँक, एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले आहेत. तर टीसीएस, डॉ. रेड्डीज, एनटीपीसी, सन फार्मा आणि बजाज ऑटोचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आयटी हार्डवेअरच्या उत्पादनाकरता पीएलआय योजनेला मंजुरी

निफ्टीच्या कामकाजात आला होता अडथळा-

शेअर बाजाराची आकडेवारी आणि माहिती व्यावसायिक आणि गुंतवणुकदारांना दाखविण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराकडून टेलिकॉम कंपन्यांची सेवा घेतली जाते. या सेवेच्या लिंकमध्ये तांत्रिक अडचण आली आहे. त्यामुळे अपडेट होण्याचे थांबल्याचे एनएसईने ट्विटरद्वारे अधिकृत माहिती दिली होती. मात्र, मुंबई शेअर बाजाराचे कामकाज नियमितपणे सुरू होते.

हेही वाचा-क्रिप्टोचलनाने आर्थिक स्थिरतेवर होणार परिणाम; आरबीआयकडून चिंता व्यक्त

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ०.५९ टक्क्यांनी वधारून ६४.८६ डॉलर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.