ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक ५२९.३६ अंशाने वधारला; वित्तीय कंपन्यांचे वधारले शेअर - निफ्टी न्यूज

अ‌ॅक्सिस बँकेचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. त्यापाठोपाठ सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि भारती एअरटेलचे शेअर वधारले आहेत.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Dec 24, 2020, 5:04 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ५२९.३६ अंशाने वधारून ४६,९७३.५४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १४८.१५ अंशाने वधारून १३,७४९.२५ वर स्थिरावला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी ट्विन्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत.

अ‌ॅक्सिस बँकेचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. त्यापाठोपाठ सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि भारती एअरटेलचे शेअर वधारले आहेत. दुसरीकडे इन्फोसिस, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया आणि टेक महिंद्राचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-शक्तीकांत दास यांची बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी कर्जाच्या व्याजदराबाबत चर्चा

एफपीआयकडून बुधवारी ५३६.१३ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी-

वित्तीय कंपन्यांच्या शेअरमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक वधारल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख विनोद मोदी यांनी सांगितले. विदेशी गुंतवणूक निधीचा शेअर बाजारात ओघ कायम राहिला आहे. एफपीआयने बुधवारी ५३६.१३ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.४८ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ५१.०४ डॉलर आहेत.

हेही वाचा-अनधिकृत डिजीटल अ‌ॅपवरून कर्ज घेताना सावध! आरबीआयकडून जनतेला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.