ETV Bharat / business

'या' बँकेच्या शेअरमध्ये तेजी; दिवसाखेर ३७७ अंशाने वधारला बाजाराचा निर्देशांक

कोटक महिंद्रा बँकेने जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत एकूण २ हजार ९४७ कोटींचा नफा मिळविला आहे. त्याचा परिणाम म्हणून कोटक महिंद्रा बँकेचे शेअर १२ टक्क्यांनी वधारले.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Oct 27, 2020, 5:00 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक ३७७.६० अंशाने वधारून ४०,५२२ वर स्थिरावला. कोटक महिंद्राच्या बँकेचे शेअर १२ टक्क्यांनी वधारले. त्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला.

निफ्टीचा निर्देशांक १२१.६५ अंशाने वधारून ११,८८९.४० वर स्थिरावला. कोटक महिंद्रा बँकेने जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत एकूण २ हजार ९४७ कोटींचा नफा मिळविला आहे. त्याचा परिणाम म्हणून कोटक महिंद्रा बँकेचे शेअर १२ टक्क्यांनी वधारले. एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माहितीनुसार कोटक बँकेने चांगला नफा मिळविला आहे. कोटक महिंद्रा बँकेकडे चांगल्या गुणवत्तेची मालमत्ता आहे.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एनटीपीसी, एल अँड टी, अ‌ॅक्सिस बँक आणि बजाज ऑटोचे शेअर वधारले. तर दुसरीकडे टीसीएस, ओएनजीसी, इन्फोसिस, एचडीएफसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर घसरले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ०.७६ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ४१.१२ डॉलर राहिले आहेत. फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत १३ पैशांनी वधारून ७३.७१ रुपये झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.