मुंबई - शेअर बाजार निर्देशांकाने आज नवा उच्चांक गाठला आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३४७.४२ अंशाने वधारून ४५,४२६.९७ वर स्थिरावला. तर शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराने ४५,४५८.९२ हा नवा उच्चांक गाठला आहे.
मुंबई शेअर बाजाराबरोबर निफ्टीचा निर्देशांक ९७.२० अंशाने वधारून १३,३५५.७५ वर स्थिरावला. तर निफ्टीने सकाळच्या सत्रात १३,३६६.६५ हा नवा उच्चांक नोंदविला आहे.
हेही वाचा-जीएसटीचा सुटला तिढा; केंद्राकडून कर्ज घेण्याचा झारखंडसह सर्व राज्यांनी स्विकारला पर्याय
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
भारती एअरटेलचे सर्वाधिक ३ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ एचयूएल, एचडीएफसी, आयटीसी, इंडसइंड बँक, एसबीआय, सन फार्मा, ओएनजीसी, टेक महिंद्रा, एल अँड टी आणि एशियन पेंट्सचे शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ कोटक बँक, नेस्ले इंडिया, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि एचडीएफसीचे शेअर घसरले.
हेही वाचा-भारत बंदमध्ये व्यापारी संघटनांसह वाहतूक क्षेत्र होणार नाही सहभागी
या कारणाने शेअर बाजार निर्देशांक वधारला-
रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतीकार विनोद मोदी म्हणाले, की जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती राहिली आहे. असे असले तरी देशातील शेअर बाजारात सकारात्मक स्थिती राहिली आहे. सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारासह निफ्टीत शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली आहे. आरबीआयने अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी दाखविलेली वचनबद्धता आणि कोरोना लसीची प्रगती या कारणाने शेअर बाजार निर्देशांक वधारल्याचे विनोद मोदी यांनी सांगितले.
जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात ब्रेंट क्रूड फ्युचरचे दर १.०२ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ४८.७५ डॉलर आहेत.