ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक ३०४ अंशाने वधारला ; 'या' कंपन्यांचे शेअर तेजीत - Bombay Share Market news

आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू होणार असताना शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. टायटनचे सर्वाधिक ४ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Oct 7, 2020, 5:46 PM IST

Updated : Oct 7, 2020, 6:01 PM IST

मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ३०४ अंशाने वधारला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी ट्विन्स आणि इन्फोसिसचे शेअर वधारल्याने शेअर बाजारात सकारात्मक स्थिती दिसून आली आहे.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक बाजार बंद होताना ३०४.३८ अंशाने वधारून ३९,८७८.९५ वर स्थिरावला. तर निफ्टी बंद होताना निर्देशांक ७६.४५ अंशाने वधारून ११,७३८.८५ वर स्थिरावला.

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

टायटनचे सर्वाधिक ४ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ बजाज ऑटो, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर वधारले आहेत. तर बजाज फायनान्स, पॉवरग्रीड, टाटा स्टील, एनटीपीसी आणि सन फार्माचे शेअर घसरले आहेत. एलकेपी सिक्युरिटीजचे मुख्य संशोधक म्हणाले, की आरबीआयने पतधोरण जाहीर करण्यापूर्वी शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. आरबीआयची पतधोरण समिती ९ ऑक्टोबरला रेपो दर व रिव्हर्स रेपो दर जाहीर करणार आहे. दरम्यान, ट्रेडर्सच्या माहितीनुसार आर्थिक पॅकेज जाहीर होण्याकडे भारतीय गुंतवणुकदारांचे लक्ष लागलेले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १.५९ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल हे ४१.९७ डॉलर आहेत. फॉरेक्स बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी वधारून ७३.३३ वर पोहोचला आहे.

Last Updated : Oct 7, 2020, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.