ETV Bharat / business

शेअर बाजार खुला होताना 600 अंशांनी वधारला निर्देशांक; ‘हे’ आहे कारण - Bombay stock Exchange today

निफ्टीमधील सर्व क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर वधारले. निफ्टी मेटल आणि खासगी बँकांचे शेअर 2.8 टक्क्यांनी वधारले.

Bombay stock Exchange
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Jun 16, 2020, 1:11 PM IST

मुंबई – शेअर बाजार खुला होताना निर्देशांक 600 अंशांनी वधारला. आशियातील शेअर बाजारात सकारात्मक स्थिती आहे, तर अमेरिकेसह युरोपमधील शेअर बाजार निर्देशांकही वधारल्याने देशातील शेअर बाजारातही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह बँकेने कॉर्पोरेट बाँड खरेदीची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे देशातील भांडवली बाजारात चलनाची तरलता वाढणार असल्याची गुंतवणूकदारांना आशा आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट जगात येणार असल्याची शेअर बाजाराची भीतीही कमी झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी सव्वा दहा वाजता 609 अंशांनी वधारून 33,837 वर पोहोचला, तर निफ्टीचा निर्देशांक 159 अंशांनी वधारून 9,972 वर पोहोचला.

या कंपन्यांचे वधारले शेअर -

निफ्टीमधील सर्व क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर वधारले. निफ्टी मेटल आणि खासगी बँकांचे शेअर 2.8 टक्क्यांनी वधारले. सार्वजनिक बँकांचे शेअर 2.2 टक्के, वित्तीय सेवांचे 3.1 टक्के, स्थावर मालमत्ता क्षेत्राचे 2.5 टक्क्यांनी शेअर वधारले, तर जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर 4.5 टक्क्यांनी वधारून प्रति शेअर 192 रुपये झाले. स्टीलचे शेअर 4.4 टक्क्यांनी वधारून प्रति शेअर हे 319.70 रुपये झाले, तर हिंदाल्कोचे शेअरही 3.2 टक्क्यांनी वधारले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.