मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात २०० अंकाने वधारला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस आणि मारुतीचे शेअर वधारले आहेत. कॉर्पोरेट करातील कपात आणि जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक वातावरणाने शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे.
विदेशी गुंतवणुकदारांनी शेअरची मोठी खरेदी सुरू ठेवल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेअर बाजार निर्देशांक ५२.७१ अंशाने वधारून ३९,१४२.७४ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १३.४० अंशाने वधारून हा ११,६१३,६० वर पोहोचला. गेल्या सत्रात सोमवारी शेअर बाजार निर्देशांक हा १०७५.४१ अंशाने वधारून ३९,०९०.०३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ३२६ अंशाने वधारून ११,६००.२० वर पोहोचला.
हेही वाचा-१७८ वर्षी जुनी थॉमस कुक कंपनी बुडीत, भारतीय शाखा मात्र अबाधित
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, सन फार्मा, टीसीएस, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, मारुती, वेदांत, ओएनजीसी, एचसीएल टेक आणि एम अँड एमचे शेअर ३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. बजाज फायनान्स, येस बँक, एशियन पेंट्स, हिरो मोटोकॉर्प, एल अँड टी, एचडीएफसी बँक, कोटक बँक आणि बजाज ऑटोचे शेअर २ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.
हेही वाचा-जुन्या साखर कारखान्यांचे लवकरच पुनरुज्जीवन करण्यात येणार
केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात केल्याने शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या भांडवली मुल्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांची चिंता दूर झाल्याचे इन्स्टीट्युशनल क्लाईंट्स ग्रुपचे सीईओ सुवीर छैनानी यांनी सांगितले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारात मोठी गुंतवणूक केल्याने वित्तीय तूट कमी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी २ हजार ६८४.०५ कोटींच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी २९१.९५ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. रुपया डॉलरच्या तुलनेत सकाळच्या सत्रात २२ पैशांनी वाढून ७०.७२ झाला आहे.
हेही वाचा-भाववाढीची 'करामत': राजधानीत सफरचंदांपेक्षा कांदे महाग!