ETV Bharat / business

गुंतवणुकदारांचा सावध पवित्रा, शेअर बाजाराच्या निर्देशांकात ७५ अंशाची घसरण

निफ्टीचा निर्देशांक २३.७५ अंशाने घसरून ११,७०० वर पोहोचला. येत्या काही दिवसात आगामी अर्थसंकल्प हा  शेअर बाजारावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.

शेअर बाजार
author img

By

Published : Jun 24, 2019, 12:16 PM IST

मुंबई - जागतिक राजकारणातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाचे अस्थिर दर यामुळे जगभरातील गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतल्याचे दिसून आले. शेअर बाजाराचा निर्देशांक ७५ अंशाने घसरून 39,118 वर पोहोचला.

निफ्टीचा निर्देशांकातही घसरण झाली. त्यात २३.७५ अंशाने घसरून निर्देशांक ११,७०० वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले
इंडुसलँड, एल अँड टी, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, टीसीएस, एनटीपीसी, एसबीआय, आयटीसी, एचडीएफसी ट्विन्स, आयसीआयसी बँक आणि इन्फोसिसचे शेअर १.३५ टक्क्यांपर्यंत वधारले. तर बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, टेकएम, ओएनजीएसी, सन फार्मा, टाटा मोटर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर २.३१ टक्क्यापर्यंत घसरले.

येत्या काही दिवसात आगामी अर्थसंकल्प हा शेअर बाजारावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.

शुक्रवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ४०७.१४ अंशाने घसरून ३९,१९४.४९ वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक हा १०७.६५ अंशाने घसरून ११,७२४.१० अंशावर पोहोचला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.