ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजारासह निफ्टीचा नवा उच्चांक

author img

By

Published : Jan 5, 2021, 7:00 PM IST

मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक घसरला होता. त्यानंतर सावरून मुंबई शेअर बाजार दिवसाखेर ४८,४३७.७८ वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

मुंबई - सलग दहाव्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर २६१ अंशाने वधारून नवा उच्चांक नोंदविला. एचडीएफसी ट्विन्स, अॅक्सिस बँक आणि टीसीएसचे शेअर वधारले.

मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक घसरला होता. त्यानंतर सावरून मुंबई शेअर बाजार दिवसाखेर ४८,४३७.७८ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराने दिवसभरात ४८,४८६.२४ हा उच्चांक नोंदविला होता. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर ६६.६० अंशाने वधारून १४,१९९ वर स्थिरावला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

अ‌ॅक्सिस बँकेचे सर्वाधिक ६ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ एचडीएफसी, इंडसइंड बँक, टीसीएस, एशियन पेंट्स, टायटन, एचसीएल टेक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले. दुसरीकडे ओएनजीसी, बजाज फायनान्स, एनटीपीसी, एम अँड एम आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले.

हेही वाचा-बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत डिसेंबरमध्ये ११ टक्क्यांनी वाढ

डीजीसीआयने कोरोनाच्या दोन लसींना परवानगी दिल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. जागतिक बाजारात ब्रेन्ट क्रूड फ्युचरचे दर प्रति बॅरल ०.६९ टक्क्यांनी वाढून ५१.४४ डॉलर आहेत.

हेही वाचा-लसीची किंमत सरकारसाठी २१९ ते २९२ रुपये-आदार पुनावाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.