मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या कॉर्पोरेट कपातीच्या निर्णयानंतर शेअर बाजारासह निफ्टीच्या निर्देशांकाने उसळी घेतली. गेल्या दहा वर्षात प्रथमच शेअर बाजार निर्देशांक हा आज ५.३२ टक्क्यांनी वधारून विक्रम केला. तर विक्रम करत निफ्टीचा निर्देशांकही ५.३३ टक्क्यांनी वधारला आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक १ हजार ९२१.१५ अंशाने अथवा ५.३२ टक्क्यांनी वधारून ३८,०१४.६२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ५७०.६५ अंश अथवा ५.३३ टक्क्यांनी वधारून ११,२७५.४५ वर पोहोचला. शेअर बाजारामधील सूचीबद्ध कंपन्यांच्या संपत्तीत एकूण ७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पणजीमध्ये जीएसटी परिषदेची बैठक झाली. यामध्ये मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात करण्यात आली. निफ्टीच्या सर्व क्षेत्राचे शेअर निर्देशांक ८.७ टक्क्यांनी वधारले आहेत. तर खासगी बँकांचे शेअर ८ टक्क्यांनी, वित्तीय सेवा कंपन्यांचे शेअर ६.७ टक्क्यांनी तर धातुंचे शेअर ५.८ टक्क्यांनी वधारले.
हेही वाचा-कॉर्पोरेट करातील कपातीने शेअर बाजाराची विक्रमी २२०० अंशाची उसळी! उद्योगातही उत्साह
आयशर मोटर्स कंपनीचे शेअर १३.८ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर १७,९३१.९५ वर पोहोचले. तर मारुतीचे शेअर १०.९ टक्क्यांनी, हिरो मोटोकॉर्पचे शेअर १०.४ टक्के तर टाटा मोटर्सचे शेअर ९.८ टक्क्यांनी वधारले. इंडुसइंड बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट आणि टायनट कंपनीचेही शेअर वधारले. या कंपन्यांचे शेअर ८.७ टक्के ते १०.७ टक्क्यापर्यंत वधारले.
हेही वाचा-जीएसटी परिषद: सरकारकडून कॉर्पोरेटला दिवाळी भेट; 'अशी' मिळणार कर सवलत
रुपया डॉलरच्या तुलनेत वधारत असताना आयटी शेअरवर विक्रीचा दबाव राहिला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि एचसीएल टेकचे शेअर घसरले आहेत.