मुंबई - शेअर बाजार निर्देशांकाने आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक गाठला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस आणि जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीने शेअर बाजारात तेजी दिसून आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शिखरावर असताना 52,641.53 वर पोहोचला होता. तर दिवसाखेर शेअर बाजाराचा निर्देशांक 52,474.76 वर स्थिरावला. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर 61.60 अंशाने वधारून 15,799.35 वर स्थिरावला.
हेही वाचा-टाळेबंदीचा फटका : प्रवासी वाहनांच्या विक्रीत 66 टक्के घसरण
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
डॉ. रेड्डीजचे सर्वाधिक सुमारे 3 टक्क्यांहून अधिक शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ पॉवरग्रीड, टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे एल अँड टी, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह व भारती एअरटेलचे शेअर घसरले आहेत. अर्थव्यवस्था सावरण्याची अपेक्षा असताना आयटी, धातू आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.22 टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल 72.68 डॉलर आहे.
हेही वाचा-एटीएममधून पैसे काढण्यावरील शुल्क १ जानेवारीपासून वाढणार