मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात दिवसाखेर अंशत: घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ३१.१२ अंशाने घसरून ५०,३६३.९६ वर स्थिरावला.
मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १९.०५ अंशाने घसरून १४,९१०.४५ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजारात एल अँड टीचा निर्देशांक दिवसाखेर १.५६ टक्क्यांनी घसरला आहे.
या कंपन्यांचे घसरले-वधारले निर्देशांक
मुंबई शेअर बाजारात एल अँड टीचा निर्देशांक दिवसाखेर १.५६ टक्क्यांनी घसरला आहे. आयसीआयसीआय बँक, एसबीआय, कोटक बँक, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, अॅक्सिस बँक आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज, एचसीएल टेक, एचयूएल आणि भारती एअरटेलचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-'कर्ज वसुली करणाऱ्या एजंटच्या बेकायदेशीर वर्तणुकीला बँका ठरणार जबाबदार'
या कारणाने शेअर बाजार निर्देशांकात घसरण-
रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख रणनीतीतज्ज्ञ विनोद मोदी म्हणाले की, वित्तीय कंपन्यांमुळे पुन्हा एकदा शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे. आज आयटी कंपन्यांच्या शेअरवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना टाळेबंदीची भीती आहे. त्याचा देशातील बाजारपेठांवर परिणाम होण्याची भीती आहे. रोख्यांची बाजारपेठ अस्थिर असताना गुंतवणुकदारांची चिंता वाढल्याचेही मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा-देशव्यापी संप: दुसऱ्या दिवशी विदेशी बँकांमधील कर्मचाऱ्यांचाही सहभाग
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १.६१ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६७.७७ डॉलर आहेत.