मुंबई - वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजार निर्देशांक वधारून स्थिरावला आहे. हा परिणाम इन्फोसिस, एचडीएफसी ट्विन्स आणि लार्सन टुब्रोच्या शेअरमधील तेजीने झाला आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ५२.२८ अंशाने वधारून ४१,३०६.०२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १४.०५ अंशाने वधारून १२,१८२.५० वर स्थिरावला.
हेही वाचा-अल्पबचत योजना : जानेवारी-मार्च तिमाहीत व्याज दर 'जैसे थे'
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
पॉवरग्रीड या कंपनीचे सर्वाधिक २.७६ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. तर एनटीपीसी, एम अँड एम, एल अँड टी, हिंदुस्थान लिव्हर, एचडीएफसी आणि इन्फोसिसचे शेअर वधारले. टायटनचे शेअर २.७६ टक्क्यांनी इंडुसइंड बँकेचे शेअर १.७१ टक्क्यांनी घसरले. त्यापाठोपाठ बजाज ऑटोचे शेअर १.२१ टक्क्यांनी घसरले.
देशाच्या चालू वित्तीय खात्यातील तूट (सीएडी) ही सप्टेंबरमध्ये ०.९ टक्क्यांनी म्हणजे ६.३ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. व्यापारी तूट कमी झाल्याने शेअर बाजार वधारल्याचे एव्हीपी इक्व्हिटी रिसर्चचे मुख्य मूलभूत संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले.
हेही वाचा-विजय मल्ल्याला दणका; विशेष न्यायालयाने बँकांना 'ही' दिली परवानगी
आयटी, एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर वधारले. तर ऑटो, धातू आणि वित्तीय संस्था या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर घसरले.