मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ५०० अंशांनी वधारला. जगभरातील शेअर बाजारात घसरण होत आहे. अशा स्थितीत जागतिक आर्थिक मंचावर धोरणात्मक निर्णय होईल, अशी बाजाराला आशा आहे. यामुळे मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी योग्य निर्णय घेईल, अशी जगभरातील बाजारांमध्ये भावना आहे. मुंबई शेअर बाजार सकाळी ९ वाजून ४१ मिनिटाला ४१० अंशांनी घसरून ३८,५५४.१९ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १६४.९५ अंशांनी वधारून ११,२९७.७० वर पोहोचला.
हेही वाचा-निषेध मोर्चांसह दंगलीने व्यवसायांवर परिणाम होतो- कोको कोला सीईओ
जागतिक खनिज तेलाचा निर्देशांक २.५० टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ५३.२० डॉलर दर झाले आहेत.
हेही वाचा-कोरोनाने कुक्कुटपालन क्षेत्राचे मोडले कंबरडे; पॅकेजची मागणी
दरम्यान, सोमवारी शेअर बाजार बाजार निर्देशांक दिवसभरात ९३९ अंशांनी वधारला. मात्र, कोरोनाचे देशात आणखी दोन रुग्ण आढळल्यानंतर १५३.२७ अंशांनी निर्देशांक घसरून ३८,१४४.०२ वर स्थिरावला आहे.