मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात १०० अंशाची घसरण झाली. बँकिंग, उर्जा आणि आयटी कंपन्यांचे शेअर सकाळच्या सत्रात घसरल्याने हा परिणाम झाला आहे.
शेअर बाजारात सकाळच्या सत्रात (साडेनऊ वाजता) १४७.६६ अंशाने घसरण होवून निर्देशांक ३६,९७५.६५ वर पोहोचला. तर निफ्टीतही ४३.२० अंशाची घसरण होवून निर्देशांक १०,९६० वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
टेक महिंद्रा, एचसीएल टेक, हिरो मोटोकॉर्प, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, एचडीएफसी, भारती एअरटेल, एम अँड एम, टीसीएस, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक आणि मारुतीचे शेअर १.८६ टक्क्यांनी घसरले आहेत.
वेदांत येस बँक, एशियन पेंट्स, टाटा स्टील, ओएनजीसी, एसबीआय आणि इंडुसइंड बँकेचे शेअर २.२२ टक्क्यांनी वधारले आहेत.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी ७५१.२६ कोटींच्या शेअरची सोमवारी विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ३०८.५६ कोटींच्या शेअरची खरेदी केली. अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्ध, सौदी अरेबियामधील ड्रोन हल्ल्यांनतर मध्य-पूर्वेतील तणावाची स्थिती आणि जागतिक मंदावलेली अर्थव्यवस्था या कारणांनी गुंतवणूकदार चिंतित आहेत.