मुंबई - आयटी बँकांच्या शेअरने मुंबई शेअर बाजार आज सावरला आहे. शेअर बाजार १७०.४२ अंशाने वधारून ४०,२८६.४८ वर स्थिरावला. निफ्टीही ३१.६५ अंशाने वधारून ११,८७२.१० वर स्थिरावला.
आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि एचडीएफसीचे शेअर हे २.६७ टक्क्यापर्यंत वधारले. तर इंडसइंड बँक, वेदांत, टाटा मोटर्स, ओएनजीसी आणि एचयूएल कंपन्यांचे शेअर हे २.७९ टक्क्यापर्यंत घसरले.
हेही वाचा-ब्रिक्स परिषद : भारत ही जगातील सर्वात खुली, गुंतवणूक स्नेही अर्थव्यवस्था - पंतप्रधान
अशी आहे देशातील आर्थिक स्थिती-
- घाऊक बाजारपेठेमधील महागाई सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये घसरून ०.१६ टक्के एवढी झाली आहे.
- किरकोळ बाजारपेठेमधील महागाईने ऑक्टोबरमध्ये गेल्या १६ महिन्यातील उच्चांक नोंदविला आहे. किरकोळ बाजारपेठेत ऑक्टोबरमध्ये महागाईची ४.६२ टक्के नोंद झाली आहे.
- मूडीज इन्वेस्टर्स सर्व्हिसने देशाच्या अंदाजित जीडीपीत आज घट केली आहे. केंद्र सरकारने आर्थिक सुधारणा करूनही देशाच्या मागणीत वाढ झाली नसल्याचे मूडीजने अहवालात म्हटले आहे.
अपेक्षेहून अधिक काळ राहिली मंदी; मूडीजने देशाच्या जीडीपीचा घटविला अंदाज
गेली काही दिवस घसरणारा रुपया आज डॉलरच्या तुलनेत १४ पैशांनी वधारून ७१.१४ वर पोहोचला आहे.