मुंबई - निफ्टीने आजपर्यंतचा १२,३११ हा सर्वोच्च निर्देशांक नोंदविला आहे. निफ्टीचा निर्देशांक ४०.९० अंशाने वधारून १२,२५६.८० वर स्थिरावला. शेअर बाजार निर्देशांक १४७ अंशाने वधारून ४१,५९९.७२ वर स्थिरावला.
एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसचे या मोठ्या कंपन्यांचे शेअर वधारले. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजार निर्देशांक वधारून बंद झाला.
हेही वाचा-खनिज तेलाचे दर कमी होवूनही पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
इन्फोसिसचे शेअर सर्वाधिक १.४७ टक्क्यांनी वधारले आहेत. इन्फोसिसची तिमाहीमधील वित्तीय कामगिरीची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, कोटक बँक, एशियन पेंट्स आणि एचयूएल कंपनीचे शेअर वधारले आहेत. आयसीआयसीआय बँक, इंडुसइंड बँक, टायटन आणि भारती एअरटेलचे शेअर १.११ टक्क्यांनी घसरले.
हेही वाचा-'या' बँकेच्या १५ हजार कर्मचाऱ्यांनी ९ महिन्यात सोडल्या नोकऱ्या
शेअर बाजार विश्लेषकाच्या माहितीनुसार गुंतणूकदारांनी कंपन्यांची तिमाहीमधील कामगिरी आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुधारणा घोषित करण्यात येतील, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे.
अमेरिका-इराणमधील तणाव निवळल्याने भांडवली बाजारातील गुंतणूकदारांची चिंता कमी झाली आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर प्रति बॅरल ०.३१ टक्क्यांनी घसरून ६५.१७ डॉलरवर पोहोचले आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपया १८ पैशांनी वधारून ७१.०३ डॉलरवर पोहोचला. तर सोने प्रति तोळा ८० रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदी प्रति किलो २०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.