मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात २०० अंशाची घसरण झाली. जागतिक आर्थिक मंचावरील प्रतिकूल स्थितीमुळे एचडीएफसी ट्विन्स, इन्फोसिस आणि आयटीसीचे शेअर घसरले. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने तोटा भरून काढल्याने शेअर हे ८ टक्क्याने वाढले आहेत. शेअर बाजार २४०.७५ टक्क्यांनी घसरून सकाळी साडेनऊ वाजता ३७, ३४१.१६ टक्क्यावर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक हा ६२.८० टक्क्यांनी घसरून ११,०४६.८५ वर पोहोचला होता.
या कंपन्यांच्या शेअरचे भाव घसरले-वधारले
एनटीपीसी, भारती, एअरटेल, एम अँड एम, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, मारुती टेकएम, इन्फोसिस, पॉवरग्रीड, एल अँड टी अँड आयटीसीचे शेअर हे ४.४५ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. टाटा मोटर्स, टाटा स्टील, सन फार्मा, ओएनजीसी, येस बँक, हिरो मोटोकॉर्प आणि एशियन पेंट्स या कंपन्यांचे शेअर २ टक्क्यांनी वधारले आहेत.
यामुळे रिलायन्सचे वधारले शेअर -
सौदी अरबमधील अरॅमको ही बलाढ्य़ कंपनी कच्चे तेल आणि रसायन उद्योगात गुंतवणूक करणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सोमवारी जाहीर केले. तसचे ब्रिटीश पेट्रोलिअमही कच्च्या तेलाच्या किरकोळ साखळी विक्रीत १.१५ लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. येत्या काही महिन्यात जीओ ही फायबरवर काम करणाऱ्या ब्रॉडब्रँडची सेवा सुरू करणार आहे. याचा परिणाम आज रिलायन्सचे शेअर ८ टक्क्यांनी वधारले आहेत.