ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजार निर्देशांकात २०० अंशाने घसरण; 'या' कंपन्यांचे घसरले शेअर

मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक २४०.९६ अंशाने घसरून ४३,९३९.०९ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ६२.८० अंशाने घसरून १२,८७५.४५ वर पोहोचला.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Nov 19, 2020, 11:47 AM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक २०० अंशाने सकाळच्या सत्रात घसरला आहे. एचडीएफसी ट्विन्स, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस कंपन्याचे शेअर घसरले. जागतिक बाजारात प्रतिकूल स्थिती असल्याने शेअर बाजारात नकारात्मक पडसाद उमटले आहे.

मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक २४०.९६ अंशाने घसरून ४३,९३९.०९ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ६२.८० अंशाने घसरून १२,८७५.४५ वर पोहोचला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

बजाज फिन्सर्व्ह, एल अँड टी, टाटा स्टील आणि बजाज फायनान्सचे शेअर वधारले. मागील सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक २२७.३४ अंशाने वधारून ४४,१८०.०५ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ६४.०५ अंशाने वधारून १२,९३८.२५ वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बुधवारी ३,०७१.९३ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

अशी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिती-

कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहरामध्ये सार्वजनिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे व्यवसाय प्रमुख अर्जुन यश महाजन यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा ०.५६ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ४४.०९ डॉलर आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.