ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांकात १५० अंशाची घसरण; बँकासह ऑटो कंपन्यांना फटका

author img

By

Published : Sep 9, 2019, 12:18 PM IST

विदेशी गुंतवणूकदार संस्थानी सातत्याने भांडवली बाजारामधून निधी काढून घेतला आहे.  या दबावामधून शेअर बाजारात घसरण सुरू असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

संग्रहित - शेअर दलाल

मुंबई - शेअर बाजारात बँकिंग, ऑटो आणि आयटी कंपन्यांचे शेअर वधारले. त्याचा परिणाम म्हणून शेअर निर्देशांकात १५० अंशाची घसरण झाली.

शेअर बाजार निर्देशांकात सकाळी साडेनऊ वाजता १४७.२० अंशाची घसरण होवून निर्देशांक ३६,८३४.५७ वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये ३१ अंशाची घसरण होवून निर्देशांक १०,९१५.२० वर पोहोचला.

हेही वाचा-भांडवली बाजारात नकारात्मक स्थिती; एफपीआयने ऑगस्टमध्ये काढून घेतले ८ हजार ३१९ कोटी

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
टाटा मोटर्स, मारुती, टाटा स्टील, एचसीएल टेक, इंडुसइंड बँक, वेदांत, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी ड्युओ, एनटीपीसी आणि अॅक्सिस बँकेचे शेअर २.४० टक्क्यापर्यंत घसरले. सन फार्मा, एचयूएल, भारती एअरटेल, एल अँड टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि आयटीसीचे शेअर १.६६ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेची विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर भिस्त; भारतीय भांडवली बाजाराला बसत आहेत धक्के

विदेशी गुंतवणूकदार संस्थानी सातत्याने भांडवली बाजारामधून निधी काढून घेतला आहे. या दबावामधून शेअर बाजारात घसरण सुरू असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) ९५७.०५ कोटींच्या शेअरची शुक्रवारी विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १ हजार २०७.२० कोटींच्या शेअरची खरेदी केली.

हेही वाचा-अधिभार कर मागे घेवूनही एफपीआयचा भांडवली शेअर बाजारामधून निधी काढण्यावर भर

मागील सत्रात शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांक ३३७.३५ अंशाने घसरून ३६,९८१.७७ वर पोहोचला होता. तर निफ्टीत ९८.३० अंशाची घसरण होवून निर्देशांक १०,९४६.२० वर पोहोचला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.