मुंबई – कोरोनाचे संकट जगभरात आणखीन वाढत आहे. या धास्तीने शेअर बाजार निर्देशांकात 210 अंशांनी घसरण झाली. बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचाही बाजाराला फटका बसला आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक 209.75 अंशांनी घसरून 34,961.52 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 70.60 अंशांनी घसरून 10,312 वर स्थिरावला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
अॅक्सिस बँकचे सर्वाधिक सुमारे 5 टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. तर त्यापाठोपाठ टेक महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया,एल अँड टी, इंडुसइंड बँक, इन्फोसिस आणि एनटीपीसीचे शेअर घसरले आहेत. एचडीएफसी बँक, एचयूएल, कोटक बँक आणि भारती एअरटेलचे शेअर वधारले आहेत.
टाळेबंदी लागू होण्याची भीती
तेलंगणासारख्या काही राज्यात अजून टाळेबंदी लागू होईल, अशी बाजाराला चिंता आहे. गुंतवणूकदार सल्लागार सुभाष येरेनेनी म्हणाले, की बाजार नेहमी पुढे पाहतो. नकारात्मक बातमीला प्रतिसाद देतो. जर दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली तर बाजार कमी वेळेत नकारात्मक प्रतिसाद देईल, असे त्यांनी सांगितले. तसेच सीमवरील तणावाच्या स्थितीने गुंतवणूकदार काळजीपूर्वक शेअरमध्ये खरेदी करत आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय
जगभरात 1 कोटी लोकांना कोरोची लागण झाली आहे. तर 5 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात 5.48 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 16 हजार 475 जणांचा मृत्यू झाला आहे.