ETV Bharat / business

घसरलेल्या जीडीपीचा धक्का ; शेअर बाजार निर्देशांकात ४०० अंशाची पडझड - GDP lowest in India

शेअर बाजार निर्देशांक सकाळी साडेनऊ वाजता ४०२ अंशाने घसरून ३६,९३०.६६ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांकही १०८.०५ अंशाने घसरून १०,९१५.२० वर पोहोचला. निर्यातीशी संबंधित असलेल्या आयटी कंपन्या  वगळता निफ्टीवरील सर्व क्षेत्रांचे शेअर ढासळले आहेत.

प्रतिकात्मक - घसरलेला शेअर बाजार
author img

By

Published : Sep 3, 2019, 12:45 PM IST

मुंबई - चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी हा ५ टक्के एवढा कमी झाल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ४०० अंशाने घसरला आहे.

शेअर बाजार निर्देशांक सकाळी साडेनऊ वाजता ४०२ अंशाने घसरून ३६,९३०.६६ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांकही १०८.०५ अंशाने घसरून १०,९१५.२० वर पोहोचला. निर्यातीशी संबंधित असलेल्या आयटी कंपन्या वगळता निफ्टीवरील सर्व क्षेत्रांचे शेअर ढासळले आहेत.

हेही वाचा-अधिभार कर मागे घेवूनही एफपीआयचा भांडवली शेअर बाजारामधून निधी काढण्यावर भर

असे आहे देशातील अर्थव्यवस्थेचे चित्र-
एप्रिल-जूनमध्ये ५ टक्के झालेला जीडीपी हा गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी जीडीपी आहे. चालू आर्थिक वर्षामधील एप्रिल-जूनच्या कालावधीत एकूण औद्योगिक उत्पादन दर ३ टक्के नोंदविण्यात आला आहे. तर गेल्या वर्षी एप्रिल-जूनदरम्यान ५.९ टक्के एकूण औद्योगिक उत्पादन दर होता. देशाचे एकूण औद्योगिक उत्पादन हे २.९ टक्क्यांनी घसरल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

हेही वाचा-एप्रिल-जुलैदरम्यान देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात २.९ टक्क्यांची घसरण

देशाची अर्थव्यवस्था ही संकटामधून जात असताना भारतीय कंपन्यांवरील कर्जाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. भारतीय कंपन्यांवरील विदेशी कर्जाचा बोझा गतवर्षीच्या तुलनेत जुलैमध्ये दुप्पट झाला आहे. हे प्रमाण ४.९८ अब्ज डॉलर एवढे झाल्याची माहिती आरबीआयच्या आकडेवारीतून दिसून आली आहे. देशातील उत्पादन क्षेत्राची कामगिरी ऑगस्टमध्ये आणखीनच घसरली आहे. गेल्या १५ महिन्यातील निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांकाचा (पीएमआय) निचांक ऑगस्टमध्ये नोंदविण्यात आला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.