मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात २०० अंशाच्या वाढीनंतर पुन्हा घसरण झाली आहे. शेअर बाजार निर्देशांक १५३ अंशाने घसरून ३६,९१५.२८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ४७.८० ने घसरून १०,९०० वर पोहोचला.
शेअर बाजार निर्देशांक सकाळी साडनेनऊ वाजता २०५.७० अंशाने वधारून ३२,२७४.६३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ६१.३५ अंशाने वधारून ११,००९ .६५ वर पोहोचला. जीडीपी घसरणार असल्याच्या अंदाजाने विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) शेअरची विक्री केली. त्यानंतर शेअर बाजार निर्देशांक सकाळी ११ वाजून २३ मिनिटाला १५३ अंशाने घसरून ३६,९१५.२८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ४७.८० ने घसरून १०,९०० वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
टाटा स्टील, वेदांत, टीसीएस, येस बँक, ओएनजीसी, टाटा मोटर्स, एचडीएफसी ट्विन्स, एसबीआय, इंडुसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर ३ टक्क्यापर्यंत वधारले. टेक एम, एचसीएल टेक, टीसीएस, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि एशिय पेंट्सचे शेअर १ टक्क्यापर्यंत घसरले.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ९८६.५८ कोटींची शेअर विकले आहेत. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ४८९.२३ कोटींची शेअर खरेदी केले आहेत.
मागील सत्रात शेअर बाजार ३८२.९१ अंशाने घसरून ३७,०६८.९३ वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक हा ९७.८० अंशाने वधारून १०,९४८.३० वर पोहोचला होता.