मुंबई - इराण-अमेरिकेमधील तणावाच्या स्थितीचे भारतीय भांडवली बाजारावर प्रतिकूल पडसाद उमटले आहेत. मुंबई शेअर बाजार निर्देशांक ५३० अंशाने कोसळला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर २ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७० डॉलर झाले आहेत.
मुंबई शेअर बाजार सकाळी १० वाजता ४४२.३१ अंशाने घसरून ४१,०२२.३० वर पोहोचला. शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना ४१,४६४ वर स्थिरावला होता. सोन्याचा दर शुक्रवारी प्रति तोळा ४१,३३० रुपये झाला होते. हा आजपर्यंतचा सोन्याचा सर्वोच्च दर आहे. निफ्टीही १ टक्क्यांनी घसरून १२,०८२.९५ वर पोहोचला.
हेही वाचा-सोन्याला नवी झळाळी! प्रति तोळा ७५२ रुपयाने महाग
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सलग ट्विट करत इराणला पुन्हा एकदा हल्ल्याचा इशारा दिला आहे. इराणने पुन्हा हल्ला करू नये, असा त्यांना मी सल्ला देत आहे. यापूर्वी कधीच एवढा मोठा हल्ला केला नाही, एवढा मोठा हल्ला करू, असे ट्विट करत ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.
हेही वाचा-वयं मोठं खोटमं! ९४ व्या वर्षी आजीबाईंनी सुरू केला व्यवसाय