मुंबई – कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहे. गेली अनेक दिवस घसरणाऱ्या रुपयाचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत शुक्रवारी 38 पैशांनी वधारले. कोरोनाची लस यशस्वी होणार असल्याच्या शक्यतेने भांडवली बाजारात आशावादी वातावरण आहे.
फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले, की कोरोनाच्या लसीचे परिणाम हे गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करणारे आहे. देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक स्थिती, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे स्थिर राहिलेले दर आणि डॉलरची कमकुवत अवस्था या कारणांनी रुपयाचे दर वधारले आहेत. बाजार खुला होताना डॉलरच्या तुलनेत एका रुपयाचे मूल्य 74.60 रुपये झाले. त्यानंतर डॉलरच्या तुलनेत दिवसअखेर रुपया 74..66 वर स्थिरावला. मागील बाजाराच्या तुलनेत रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 38 पैशांची वाढले आहे.
दरम्यान, रुपयाचे डॉलरच्या तुलनेत गुरुवारी मूल्य 56 पैशांनी वधारले होते. बाजार बंद होताना डॉलरच्या तुलनेत रुपया हा 75.4 मूल्यावर पोहोचले होते. हा गेल्या तीन महिन्यात गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत सर्वाधिक वधारला होता.
अहमदाबादमधील झायडस कॅडिला हेल्थकेअरने तयार केलेल्या कोरोना लसीची मानवावर चाचणी घेण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) परवानगी दिली आहे. महामारीच्या काळात आपत्कालीन परिस्थिती व तातडीची वैद्यकीय गरज लक्षात घेऊन कोरोनावरील विषय तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनंतर लसीच्या पुढील चाचणीसाठी वेगाने परवानगी देण्यात आली आहे.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 556.72 कोटी रुपयांच्या शेअरची गुरुवारी विक्री केली होती. त्यामुळे भांडवली बाजारात आंतरराष्ट्रीय विदेशी गुंतवणूकदार संस्था हे शेअरचे सर्वात मोठे विक्रेते झाले होते. जागतिक खनिज तेलाच्या दराचा निर्देशांक असलेल्या ब्रेंट क्रूड फ्यूचर्सचे (खनिज तेलाचे भविष्यातील सौद्यातील दर) दर १.११ टक्क्यांनी घसरून 42.66 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत.