मुंबई - रुपयाची डॉलरच्या तुलनेत २३ पैशांची घसरण सकाळच्या सत्रात झाली आहे. या घसरणीनंतर रुपयाचे मुल्य हे डॉलरच्या तुलनेत ७१.६६ रुपये झाले आहे.
कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून काढून घेतलेला निधी या कारणांनी रुपयाची घसरण झाली. गेल्या सहा महिन्यात रुपयाची डॉलरच्या तुलनेत २९ पैसे एवढी सोमवारी नीचांकी घसरण झाली होती. त्यामुळे रुपयाचे डॉलरच्या तुलनेत ७१.४३ मुल्य झाले होते.
फोरेक्स ट्रेडर म्हणाले, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत सरकारने हस्तक्षेप करण्याची गुंतवणूकदार हे वाट पाहत आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार क्षेत्रनिहाय लवकरच पॅकेज घोषित करेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआयएस) सोमवारी ३०५.७४ कोटींच्या शेअरची विक्री केली. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल हे ०.०५ टक्क्यांनी वाढून ५९.७७ डॉलर झाले आहेत.
या गोष्टीवर गुंतवणूकदारांचे राहणार लक्ष -
आरबीआय, फेडरल ओपन मार्केट कमिटी (एफओएमसी) आणि युरोपियन सेंट्रल बँक (ईसीबी) मिनिट्स आदी गोष्टीवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.