नवी दिल्ली - किरकोळ बाजारपेठेत फेब्रुवारीमध्ये महागाईचे प्रमाण वाढून ५.०३ टक्के झाले आहे. जानेवारीत ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण ४.०६ टक्के होते.
अन्नाच्या किमती वाढल्याने फेब्रुवारीमध्ये किरकोळ बाजारपेठेत महागाई वाढली आहे. अन्नाच्या वर्गवारीत फेब्रुवारीत महागाईचे प्रमाण ३.८७ टक्के राहिले आहे. तर त्यापूर्वी जानेवारीत महागाईचे प्रमाण हे १.८९ टक्के होते. ही आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) दिली आहे.
हेही वाचा-शेअर बाजाराच्या पडझडीचा फटका; गुंतवणुकदारांच्या संपत्तीत १.३७ लाख कोटींची घट
इंधन आणि वीजच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण हे फेब्रुवारीमध्ये ३.५३ टक्के राहिले. हे प्रमाण जानेवारीत ३.८७ टक्के होते. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण निश्चित करताना किरकोळ बाजारपेठेतील महागाईचा विचार करण्यात येतो. आरबीआयने किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण हे २ ते ४ टक्के या प्रमाणात ठेवण्याची मर्यादा सरकारने निश्चित करून दिली आहे.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठल्याने मागणीत कमालीची घट
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल व डिझेलच्या किमतीनेही नवा उच्चांक गाठला आहे.