ETV Bharat / business

कोरोनातही रिलायन्सची घौडदौड : ओलांडला भांडवली मुल्यात 14 लाख कोटींचा टप्पा - रिलायन्स भांडवली मूल्य

कर्जाची परतफेड आणि विक्रमी गुंतवणूक मिळाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा ताळेबंद बळकट झाल्याचे रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. रिलायन्सकडे उच्च तरलक्षमता असल्याने जिओ, रिटेल आणि ऑईल टू केमिकल बिझनेसकडे विकास वाढविण्यासाठी नियोजन असल्याचे अंबानी यांनी सांगितले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज
रिलायन्स इंडस्ट्रीज
author img

By

Published : Jun 3, 2021, 6:58 PM IST

मुंबई - कोरोना महामारीतही रिलायन्स इंडस्ट्रीजची घौडदौड सुरुच आहे. सलग सातव्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आज वधारले आहेत. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भांडवली बाजार मुल्याने सकाळच्या सत्रात 14 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर सात सत्रांमध्ये एकूण 14.53 टक्क्यांनी वधारले होते. मुंबई शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअरची किंमत 2,250 रुपयांवर पोहोचली आहे. शेअरच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने रिलायन्सचे भांडवली मूल्य हे 14,04,123.26 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

कर्जाची परतफेड आणि विक्रमी गुंतवणूक मिळाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा ताळेबंद बळकट झाल्याचे रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. रिलायन्सकडे उच्च तरलक्षमता असल्याने जिओ, रिटेल आणि ऑईल टू केमिकल बिझनेसकडे विकास वाढविण्यासाठी नियोजन असल्याचे अंबानी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-स्पूटनिकच्या उत्पादनात सीरमही शर्यतीत... सरकारकडे मागितली परवानगी

  • रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालानुसार कंपनीने जिओमधील काही हिस्सा 2 लाख कोटी रुपयांना विकला आहे. तर रिटेलमधील हिस्सा 7,629 कोटी रुपयांना विकला आहे.
  • राईट्स इश्यूमधून रिलायन्सने 53,124 कोटी रुपये जमविले आहेत.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये रिलायन्सने 53,124 कोटी रुपयांचे राईट्स इश्यू जारी केले आहेत.
  • गेल्या दहा वर्षात बिगर वित्तीय संस्थांनी जारी केलेल्या राईट्स इश्यूचे जगात सर्वाधिक प्रमाण आहे.

हेही वाचा-चीनची हुवाई अमेरिकेच्या गुगलला देणार टक्कर; स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टिम लाँच

जिओ जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय केबल सिस्टिम बांधणार

रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय केबल सिस्टिम बांधणार आहे. यामधे सिस्टिमध्ये भारत केंद्रस्थानी असणार आहे. त्यासाठी कंपनीने सबकॉमसारख्या जागतिक सागरी केबल पुरवठादाराशी करार केले आहेत. येणाऱ्या पिढीसासाठी वेगवान इंटरनेट उपलबद्ध करून देण्यासाठी सागरी केबल नेटवर्क उभारण्यात येणार आहे. जगात पहिल्यांदाच सागरी दूरसंचार फायबर ऑप्टिकलच्या नेटवर्कमध्ये केंद्रस्थानी भारत असणार आहे. त्यामधून जिओच्या 2016 च्या लाँचिंगनंतर भारताचे वाढलेले महत्त्व, वृद्धी आणि डाटाचा वाढलेला वापर अधोरेखित होतो. उच्च क्षमता आणि उच्च वेगवान व्यवस्थेमुळे 200 टीबीपीएसची क्षमता प्राप्त होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.