नवी दिल्ली - रेलटेलच्या प्रारंभिक भागविक्रीला (आयपीओ) शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आयपीओच्या खरेदीसाठी शेवटच्या दिवशी गुंतवणुकदारांनी ४२.३९ पटीने अधिक अर्जभरणा केला आहे.
रेलटेलची ६ कोटी ११ लाख ९५ हजार ९२३ शेअरची ऑफर होती. प्रत्यक्षात गुंतवणूदारांनी २ अब्ज ५९ कोटी ४२ लाख ४३ हजार ३७० शेअरसाठी बोली लावल्या आहेत.
हेही वाचा-अॅमेझॉनच्या ई-कॉमर्स पोर्टलवर बंदी आणावी-सीएआयटीची मागणी
- पात्रता संस्थात्मक खरेदीदारांच्या (क्यूआयबी) वर्गवारीतील गुंतवणुकदारांनी ६५.१४ टक्क्यांहून अधिक अर्जभरणा केला आहे.
- तर बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांनी ७३.२५ पटीने अधिक अर्जभरणा केला आहे.
- वैयक्तिक गुंतवणुकदारांनी १६.७८ पटीहून अधिक अर्जभरणा केला आहे.
- ८ कोटी ७१ लाख ५३ हजार ३६९ कोटी रुपयांच्या शेअरसाठी प्रत्येकी किंमत ९३ ते ९४ रुपये आहे.
- रेलटेल कॉर्पोरेशन इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला म्हणाले की, सर्व प्रकारच्या गुंतवणुकदारांच्या श्रेणीतून उदंड प्रतिसाद मिळत असल्याने आनंद होत आहे.
- आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स आणि सिक्युरिटीज लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स हे रेलटेलच्या आयपीओचे व्यवस्थापन करत आहेत.
हेही वाचा-कर्मचाऱ्यांना लस देण्याकरता परवानगी द्या-सीआयआयची केंद्राला विनंती