नवी दिल्ली - देशातील खनिज तेल कंपन्यांनी पेट्रोलसह डिझेलच्या दरात मोठी कपात केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारात मागणी कमी झाल्याने खनिज तेलाचे दर घसरले आहेत. पेट्रोलचा दर प्रति लिटर २७ पैशांनी आणि डिझेलचा दर प्रति लिटर ३० पैशांनी कमी झाले आहेत.
दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७४.१६ रुपये, मुंबईत ७९.७६ रुपये, कोलकात्यात ७६.७७ रुपये आणि चेन्नईत ७७.०३ रुपये आहे. डिझेलचा दर दिल्लीत प्रति लिटर ६७.३१ रुपये आहे. तर मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ७०.५६ रुपये, कोलकात्यात ६९.६७ रुपये आणि चेन्नईत डिझेलचा दर ७१.११ रुपये आहे.
हेही वाचा-'या' सरकारी बँकेची ३८.१९ कोटी रुपयांची फसवणूक
जागतिक बाजारात खनिज तेलाचा दर शनिवारी प्रति बॅरल २.४३ टक्क्यांनी घसरून ६०.५६ डॉलरवर पोहोचला. तर त्यापूर्वीच्या सत्रात खनिज तेलाच्या प्रति बॅरलचा दर हा ६२.०७ डॉलर होता. चीनमध्ये कोरोना या विषाणुजन्य रोगामुळे सुमारे ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणुजन्य रोगामुळे चीनकडून खनिज तेलाची मागणी कमी झाली आहे.
हेही वाचा- भारताचा मंदावलेला विकासदर तात्पुरता - आएमएफ प्रमुख