नवी दिल्ली - नववर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र, दुसऱ्याच दिवशी खनिज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. पेट्रोलचे दर बहुतांश शहरात ८ ते ११ पैशांनी आणि डिझेलचे दर ११ ते १४ पैशांनी वाढले आहेत.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर हा ७५.२५ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ६८.१० रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर ७७.२७ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर हा ७०.४९ रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ७०.८७ रुपये तर डिझेल प्रति लिटर ७१.८९ रुपये आहे.
हेही वाचा-सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे दागिन्यांच्या मागणीवर परिणाम
सरकारी खनिज तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीचा रोज आढावा घेण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर कंपन्यांकडून बदलण्यात येतात. हे नवे दर सकाळी सहा वाजल्यापासून देशभरातील पेट्रोल पंपावर लागू होतात. रुपयाचा डॉलरसाठी असलेल्या विनिमय दराचाही खनिज तेलाच्या दरावर परिणाम होतो.