नवी दिल्ली - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक भांडवल असलेली कंपनी ठरली आहे. सर्वाधिक भांडवली मूल्य असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजला टीसीएसने मागे टाकले आहे.
शेअर बाजाराच्या आज दुपारच्या सत्रात टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) भांडवली मूल्य हे १२,४५,३४१.४४ कोटी रुपये झाले आहे. तर रिलायन्सचे भांडवली मूल्य हे १२,४२,५९३.७८ कोटी रुपये झाले आहे. रिलायन्सचे शेअर ४.८४ टक्क्यांनी घसरून प्रति शेअर १,९५०.३० रुपये आहेत. रिलायन्सच्या नफ्यात वाढ होऊनही गुंतवणूकदारांनी रिलायन्सच्या शेअरमध्ये फारसा उत्साह दाखविला नाही. तर दुसरीकडे टीसीएसच्या शेअची किंमत १.२६ टक्क्यांनी वाढून प्रति शेअर ३,३४५.२५ रुपये आहे. यापूर्वी टीसीएस ही गतवर्षी मार्चमध्येही देशातील सर्वात मोठी भांडवली मूल्य असलेली कंपनी ठरली होती. दरम्यान, कंपन्यांच्या शेअरच्या किमतीप्रमाणे कंपन्यांचे भांडवली मूल्य बदलत असते.
हेही वाचा-जागतिक आर्थिक मंचाच्या दावोस येथील परिषदेला उद्यापासून प्रारंभ
भांडवली मूल्य म्हणजे काय ?
भांडवली मूल्य = कंपन्यांचे एकूण असलेले शेअर X एका शेअरची किंमत
जसे कंपनीच्या शेअरचे मूल्य बदलते. तसेच भांडवली मूल्य बदलते. शेअरची किंमत अथवा संख्या वाढली तर भांडवली मूल्य वाढते.
हेही वाचा-'स्वतंत्र संशोधन आणि विकास लॅब सुरू करण्याकरता अर्थसंकल्पात तरतूद करा'