बंगळुरू- इलेक्ट्रिक स्कूटरची प्रतिक्षा संपणार आहे. कारण, ओलाने इलेक्ट्रिक स्कूटर 15 ऑगस्टला लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे.
ओलाचे चेअरमन आणि ग्रुपचे सीईओ भाविष अग्रवाल यांनी ओला स्कूटरच्या लाँचिंगचा कार्यक्रम करणार असल्याची ट्विटरवर माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की जे स्कूटरसाठी पात्र ठरतात, त्या सर्वांचे आभार. ओला स्कूटरचे 15 ऑगस्टला लाँचिंग करण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबतची माहिती आणि ठिकाण लवकरच जाहीर करणार आहोत. ही माहिती पुढे पाहत आहोत. यापूर्वी ओलाने 15 जुलैपासून 499 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनीच्या माहितीनुसार 24 तासांमध्ये 1 लाख बुकिंग झाले आहे.
हेही वाचा-बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी; कोकण राज्यात अव्वल
ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे चार्जिंग हे घरातील 5ए सॉकेटच्या मदतीने करता येते. कंपनीने दुचाकीकरिता चार्जिंग नेटवर्कसाठी काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीकडून देशभरातील 400 शहरांमध्ये ग्राहकांकरिता 1 लाख चार्जिंग पाँईट्स सुरू करण्यात येणार आहेत.
8 मिनिटात 50 टक्के रिचार्ज-
कंपनीने अद्याप ई-स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही. ओलाची ई-स्कूटर ही 18 मिनिटात 50 टक्के रिचार्ज होते. तर 75 किलोमीटर स्कूटर धावू शकते
हेही वाचा-पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजची घोषणा, व्यापाऱ्यांना 50 हजारांची मदत
ओलाकडून 10 हजार तरुणांना मिळणार नोकऱ्या
ओला इलेक्ट्रिक कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत जुलैमध्ये लाँच करणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी कंपनीकडून हायपरचार्जर नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. या नेटवर्कमध्ये देशातील 400 शहरांमध्ये 1 लाख चार्जिंग पॉईंट सुरू करण्यात येणार आहे. ओलाने तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या कारखान्यासाठी 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. या कारखान्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 10,000 नोकऱ्या तरुणांना मिळू शकणार आहेत. तर हा कारखाना जगातील सर्वात मोठा स्कूटरची निर्मिती करणारा कारखाना असणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कारखान्यामधून वार्षिक 20 लाख स्कूटरची निर्मिती होऊ शकणार आहे.