नवी दिल्ली -अमेरिकन खनिज तेलाच्या किमतीत आज पुन्हा घसरण झाली आहे. एनवायएमईएक्सवर डब्ल्यूटीआयच्या खनिज तेलाची किंमत २० टक्क्यापर्यंत घसरली आहे. खनिज तेलाच्या पुरवठा कमी झाला असला तरी साठवण क्षमतेचा प्रश्न आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या किमती घसरल्या आहेत.
वेस्ट टेक्सास इंटरमिडियट (डब्ल्यूटीआय) या खनिज तेलाच्या निर्देशांकावर प्रति बॅरलची किंमत ही प्रति बॅरल १९.९७ डॉलरवरून १०.२४ डॉलर झाली आहे. जागतिक बाजारात मागणी थंडावली असतानाही खनिज तेलाचा पुरवठा सुरू आहे. अशा स्थिती खनिज तेलाच्या साठवण क्षमतेचा प्रश्न निर्माण होत असल्याने खनिज तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. आठवडाभरापूर्वी खनिज तेलाच्या किमती या शून्यापर्यंत घसरल्या होत्या.
हेही वाचा-'५ जी' युगाची तयारी: नोकियाला भारती एअरटेलकडून साडेसात हजार कोटींचे कंत्राट
खनिज तेलाच्या उत्पादक राष्ट्रांची संघटनेने (ओपेक) प्रतिस्पर्धी रशियाबरोबर खनिज तेलाचा पुरवठा कमी करण्यासाठी करार केला आहे. त्यानंतरही खनिज तेलाच्या किमती घसरल्या आहेत. बाजारात खनिज तेलाचा एवढा पुरवठा होत आहे की खनिज तेलाचे वाटप मोफत होवू शकते. इंटरकन्टीनेन्ट एक्सचेंजवरील (आयसीई) खनिज तेलाची किंमत ३.९० टक्क्यांनी घसरून १९.२१ प्रति डॉलर झाली आहे.
हेही वाचा-कोरोनाची दुसरी लाट आली तर.. ४२ टक्के कंपन्यांचे शून्य नियोजन