टेक डेस्क - Apple ची लाईव्ह स्ट्रिमिंग सेवा २५ मार्चला सुरू होत आहे, असे समजते. याला जोरदार टक्कर देण्यासाठी Netflix ने नवीन योजना आखली आहे. भारतात Netflix ने युजर्ससाठी किफायतशीर सब्स्क्रिप्शन प्लानची टेस्टिंग सुरू केली आहे. कंपनीने २५० रुपयांमध्ये सब्स्क्रिप्शन प्लान सुरू केला आहे.
हा एंट्री लेव्हल स्ट्रिमिंग प्लान केवळ मोबाईल युजर्ससाठी आहे. या प्लानमध्ये ३० दिवसांसाठी युजर्स नेटफ्लिक्सचा वापर करू शकणार आहेत. या प्लानची किंमत स्टँडर्ड डेफिनिशनच्या बेसिक पॅकेजच्या तुलनेत निम्मी आहे. या प्लानमध्ये सब्सक्रायबर्स केवळ मोबाईल स्क्रीनवर स्टँडर्ड डेफिनिशन कंटेंट बघू शकणार. या प्लानमध्ये HD कंटेंट युजर्स बघू शकणार नाहीत. या प्लानमध्ये सब्सक्रायबर्स कन्टेंट केवळ मोबाईलमध्ये बघू शकणार आहेत.
भारतात नेटफ्लिक्सचा सर्वात महाग प्लान प्रीमियम अल्ट्रा HD (८०० रुपये प्रति महिना) आहे. यामध्ये युजर्स एकाचवेळी ४ स्क्रीन्सवर HD आणि अल्ट्रा HD कंटेंट स्ट्रिम बघू शकतात आणि डाउनलोड करू शकतात. स्टँडर्ड HD प्लान 650 रुपये प्रति महिन्याच्या मासिक मूल्यावर उपलब्ध आहे. तर बेसिग सब्स्क्रिप्शन प्लान ५०० रुपये प्रति महिन्याच्या दरात उपलब्ध आहे.